आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्त्यां विरोधात शिवसैनिकांचा संताप:‘संपर्कप्रमुख बबन घोलप हटाव उद्धव सेना बचाव’चा शिवसैनिकांचे उद्धव ठाकरे यांना साकडे

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता शहरातील पदाधिकारी नियुक्तीवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी खुद्द बबनराव घोलप यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. याबाबत शिवसैनिकांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले असून यामध्ये शिवसेना नेते बबन घोलप हटाव शिवसेना बचाव अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे शिवसैनिकानी लेखी निवेदनाद्वारे माध्यमांना माहीती दिली.

राहाता शहरातील शिवसैनिकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत व कार्यकारणीत शिंदे गटाचा वरचष्मा असल्याचा संभ्रम शिवसैनिकात निर्माण झाला असल्याचे म्हटले आहे. तसेच शिर्डी शिवसेना लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख बबन घोलप यांनी मतदारसंघांमध्ये शिवसेना संघटनेच्या पदाधिकारी यांच्या नेमणूक केल्या आहे, मात्र नेमणुका जी लोक शिवसेनेच्या शिंदे गटात वावरत होती ती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अचानक सोशल मीडियावर त्यांच्या अभिनंदनचे फोटो प्रसारित करत होती.अशा लोकांना संपर्कप्रमुख बबन घोलप यांनी अचानक पदावर घेऊन निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय केला असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. नूतन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करताना त्यांची राजकीय सामाजिक प्रतिमा न तपासता त्यांच्या नेमणूक केल्या असल्याचाही आरोप या निवेदनात केला आहे. राहाता शहरातील कार्यकारणी बदलतांना नूतन पदाधिकाऱ्यांची राजकीय सामाजिक व पक्षनिष्ठा तपासणे गरजेचे होते. परंतु असे न करता माजीमंत्री बबनराव घोलप यांनी नेमके कोणत्या बाबीवर पदाधिकारी यांच्या नेमणूक केल्या आहे.शिवसेना नेते बबन घोलप हे राहाता शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांसोबत फिरले असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे. शिवसेनेशी गद्दारी केलेल्या कार्यकर्त्यांसोबत फिरले व पक्षनिष्ठा असणारे कार्यकर्त्यांना टाळून राहाता शहरात गटबाजी निर्माण केली का ? पक्ष संपवण्यासाठी असा प्रकार चालू आहे का ? असा प्रश्न निष्ठावंत शिवसैनिकांना पडला आहे. म्हणूनच राहात्यातील शिवसैनिक नेते बबन घोलप हटाव शिवसेना बचाव अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेले कार्यकर्ते यांचे पुरावे संपर्कप्रमुख बबन घोलप यांना देऊनसुद्धा त्यांनी याबाबत विचार न करता अथवा कुठलीही दखल न घेता उलट त्याच व्यक्तींना पदे बहाल केली असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

या सर्व बाबी आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून सांगणार आहे. बबन घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देऊ नये. आयात केलेला उमेदवार नको अशी मागणी करणार आहे.या निवेदनावर माजी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र अग्रवाल, उपशहरप्रमुख गोरख वाकचौरे, दिपक अमोल खापटे, शेखर जमदाडे विजय पारधे संदीप सोनवणे अमित महाले, तनवीर शेख, विकास सोमवंशी, किरण गायकवाड, शिवाजी मोरे, वैभव सोमवंशी, प्रशांत डोखे यांची नावे आहे.

बातम्या आणखी आहेत...