आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई करण्याची मागणी:ड्रीम सिटीचे पाणी अखेर शिवसेनेने तोडले; नागरिकांची मनपात धाव

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-कल्याण रोडवरील ड्रीम सिटी गृहप्रकल्पाचे पाण्याचे कनेक्शन केडगाव येथील शिवसेनेचे नगरसेवक विजय पठारे व अमोल येवले यांनी रविवारी तोडले. मागील महिन्यात त्यांनी सदरचे नळ कनेक्शन तोडून आंदोलन करण्याचा इशारा मनपाला दिला होता. दरम्यान, ड्रीम सिटी मधील नागरिकांनी महापालिकेतील धाव घेऊन संबंधित नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. केडगावला पाणीपुरवठा करणाऱ्या लाईन वरून ड्रीम सिटीला देण्यात आलेल्या नळ कनेक्शनचा मुद्दा मागील वर्षभरापासून गाजत होता. या संदर्भात केडगाव येथील शिवसेनेच्या नगरसेवकांनी या कनेक्शनमुळे केडगावच्या पाण्यावर परिणाम झाल्याचा दावा करत हे कनेक्शन तोडण्याचा इशारा महापालिकेला दिला होता. महापालिकेकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे रविवारी नगरसेवकांनी आंदोलन करत सदरचे नळ कनेक्शन तोडले.

दरम्यान, यामुळे प्रकल्पातील सुमारे ४०० कुटुंबांवर पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेने ड्रीम सिटीचे नळ कनेक्शन पूर्ववत जोडावे या मागणीसाठी रहिवाशांनी मनपात ठिय्या आंदोलन केले. रहिवाशांनी नगरसेवकांवर व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करावा, तातडीने पाणी कनेक्शन पुन्हा जोडावे, अन्यथा नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...