आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणाबाजी:शिवसेनेकडून खासदार राऊत यांच्यावरील कारवाईचा निषेध, पदाधिकाऱ्यांनी संगमनेर बसस्थानकासमोर मंगळवारी केंद्र सरकार, ईडी व भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी

संगमनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्त करत इडीने सूडबुद्धीने केलेली कारवाई भाजप केंद्रीय नेतृत्वाच्या सांगण्यावरुन करण्यात आल्याचा आरोप शहर शिवसेनेने करत या घटनेचा निषेध केला. या विरोधात पदाधिकाऱ्यांनी संगमनेर बसस्थानकासमोर मंगळवारी केंद्र सरकार, ईडी व भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून भाजपाच्या इशाऱ्यावर विरोधी पक्षातील नेत्यांवर सूडबुद्धीचे राजकारण करत कारवाई करत आहे. ज्या भ्रष्टाचारी नेत्यांनी भाजपात प्रवेश केला, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. हा प्रकार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांद्वारे जनतेसमोर वारंवार मांडला. भ्रष्ट व नितीमत्ता सोडून वागणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात मोलाची भूमिका बजावली. भाजपचे पितळ उघड करत राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर ईडी कारवाई करत असल्याचे आरोप केल्याने इडीने सूडबुद्धीने कारवाई केली. असेच सुरु राहिले तर भाजपा विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेऊ, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, प्रसाद पवार, नरेश माळवे, दीपक साळुंके, रमेश काळे, जालिन्दर लहामगे, राजू सातपुते, वैभव अभंग, संभव लोढा, दिनेश फटांगरे, सुदर्शन इटप, योगेश बिचकर, सागर भागवत, विजय शिंदे, इम्तियाज शेख, विकास डमाळे, अमोल डुकरे, अमित चव्हाण, अमोल कवडे, जयदेव यादव, त्रिलोक कतारी, वेणुगोपाल लाहोटी, आजिज मोमिन, गोविंद नागरे, विजय भागवत, बाळासाहेब व्यवहारे, अनिल खुळे, सचिन पावबाकी, दीपक वनम, रमेश काळे अक्षय धुमाळ, प्रथमेश बेल्हेकर यांनी यावेळी दिला.

बातम्या आणखी आहेत...