आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतिदिन:शिवरायांचा वारसा उमाजी राजे यांनी पुढे‎ चालवला : प्रा. सुवर्णा शेलार‎

श्रीगोंदे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदे येथील‎ संकुलातील महादजी शिंदे विद्यालयात उमाजी राजे‎ नाईक यांचा स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात‎ आले. महादजी शिंदे विद्यालयातील प्रा. सुवर्णा शेलार‎ कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. उमाजी राजे नाईक यांनी‎ शिवाजी महाराजांचे स्वराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समता,‎ पुन्हा निर्माण करण्यासाठी संघर्ष केला, असे शेलार‎ यांनी सांगितले.

यावेळी सुरेश गायकवाड यांनी मनोगत‎ व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक‎ भाऊसाहेब गदादे, विलास लबडे, रामचंद्र भांगरे,‎ प्रदीप पाडळे, बापू जाधव, वासुदेव सोनवणे, ज्येष्ठ‎ शिक्षिका अरुणा तोरडमल, ज्योत्स्ना लोखंडे, युगंधरा‎ पाडळे, कोमल जाधव, सोनाली मचाले, सर्व शिक्षक‎ वृंद उपस्थित होते. प्रास्ताविक कलाशिक्षक संतोष‎ शिंदे यांनी केले. आभार स्काऊट विभाग प्रमुख‎ विकास लोखंडे यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...