आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवभोजन थाळी:50 दिवस 50 लाख खाल्ले, लाखभर लाभार्थी दाखवून लाटले अनुदान

नगर ( अरुण नवथर )10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकच व्यक्ती एकाच दिवशी अनेक केंद्रांची बनली ‘लाभार्थी'

मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी याेजना असलेल्या शिवभाेजन थाळीचा ‘लाभ’ वेगळ्याच ‘लाभार्थीं’ना हाेत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत पुढे आला आहे. लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या बेघरांच्या व गाेरगरिबांच्या भाेजनाची साेय करण्यासाठी या याेजनेला देण्यात आलेल्या सवलतींचा माेठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे पुढे येत आहे. एकट्या नगर शहरात लाॅकडाऊनच्या ५० दिवसांत शिवभाेजन थाळ्यांचे बिल ५० लाखांच्या पुढे आहे. राज्याचा विचार करता हा गैरव्यवहार प्रचंड प्रमाणात असू शकतो.

हे प्रकरण गंभीरच.. - छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

ही बाब फार गंभीर आहे. आम्ही याची पूर्ण चाैकशी करणार आहाेत. लाॅकडाऊनच्या काळात अडकलेल्या गाेरगरिबांच्या जेवणाचा प्रश्न मिटावा म्हणून यात सवलत दिली हाेती. गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही.

बातम्या आणखी आहेत...