आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:संगमनेरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा; विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने उपक्रम

संगमनेर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गवाहिनी व संगमनेर प्रखंड यांच्या वतीने रविवार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज संग्रामसिंग जयसिंगराव गायकवाड यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सकाळी ११ ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने व देशातील पवित्र ११ नद्यांचे जलपूजन करून राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक अशोकराव सराफ, पतितपावन संघटनेचे प्रांताध्यक्ष व शिवव्याख्याते प्रा. एस. झेड. देशमुख, विश्व हिंदू परिषदेचे गोपाळ राठी, प्रशांत बेल्हेकर, सचिन कानकाटे, बजरंग दलचे कुलदीप ठाकूर, संदीप वारे, विशाल वाकचौरे, शुभम कपिले, संगमनेर व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष नीलेश जाजू, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रसाद पवार, शारदा पतसंस्थेचे उपाध्यक्ष सोमनाथ कानकाटे, सीताराम मोहरीकर, प्रकाश राठी, राहुल भोईर, अमोल खताळ, सुदर्शन इट्टप, कांचन ढोरे तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह शहर व तालुक्यातील शिवभक्तांनी सोहळ्याला मोठी हजेरी लावली होती. शिववंदना व आरतीने सोहळ्याचा समारोप झाला. तदनंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...