आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:पारनेर ग्रामीण पतसंस्थेमध्ये गोळीबार; 5.20 लाख लुटले, व्यवस्थापक गंभीर

पारनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सव्वापाच लाख रुपये लुटण्यात आलेली बेलवंडी फाटा शाखा. - Divya Marathi
सव्वापाच लाख रुपये लुटण्यात आलेली बेलवंडी फाटा शाखा.

पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या बेलवंडी फाटा शाखेत भरदिवसा गोळीबार करीत सव्वापाच लाख रुपये लुटल्याची खळबळजनक घडली. तालुक्यातील बेलवंडी फाटा येथे नगर-पुणे महामार्गावर मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी शनिवारी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास अज्ञात दरोडेखोराने शाखेत प्रवेश करत रोखपाल वर्षाराणी वाघमारे यांना पिस्तुलाचा धाक दाखवत रोकड सूपूर्द करण्यास फर्मावले. वाघमारे यांनी घाबरून सुमारे ५ लाख २० हजार रुपये दरोडेखोराच्या हवाली केले. रोकड घेऊन दरोडेखोर शाखेच्या बाहेर पडत असताना काही कामानिमित्त बाहेर गेलेले शाखा व्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे शाखेत परतले. त्यांनी दरोडेखोराला प्रतिकार केला. फरशी पुसण्याच्या दांडक्याने त्यांनी दरोडेखोराला मारण्यास सुरुवात केली. दरोडेखोराने त्यांच्यावर गोळी झाडली. दरोडेखोराने दुचाकीवरून शिरूरकडे पोबारा केला. दरोडेखोराने झाडलेली गोळी सोनवणे यांच्या छातीवर डाव्या बाजूला लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी शिरूर (पुणे) येथे हलवण्यात आले. मात्र सोनवणे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आला. सोनवणे यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सुपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन गोकावे पथकासह घटनास्थळी पोहोचले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तसेच बेलवंडी ठाण्याच्या पथकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

व्यवस्थापकांवर शस्त्रक्रिया करून गोळी बाहेर काढणार
शाखा व्यवस्थापक सोनवणेंच्या छातीच्या डाव्या बाजूला लागलेली गोळी सुदैवाने हृदयाला इजा न करता बरगडीला लागून पोटात गेल्याने सोनवणे यांच्या जीविताचा धोका कमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर रात्री उशिरा शस्त्रक्रिया करून पोटात गेलेली गोळी काढली जाणार आहे. सोनवणे यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...