आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षक आपल्या ज्ञानाची विद्यार्थ्यांच्या विकासासात गुंतवणूक करतात.त्यांनी केलेली गुंतवणूक व त्यातून मिळणारा फायदा याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा व त्याचा फायदा समाजासाठी व्हावा.गणित विज्ञान प्रदर्शनाचा फायदा विज्ञाननिष्ठ समाजासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन बेलापूरचे भूमिपूत्र आयकर आयुक्त विलास शिंदे यांनी केले.
ते बेलापूर येथे श्रीरामपूर पंचायत समिती शिक्षण विभाग, तालुका विज्ञान गणित अध्यापक संघटना तसेच जेटीएस विद्यासंकुल यांचे संयुक्त विद्यमाने ५० वे श्रीरामपूर तालुका गणित विज्ञान प्रदर्शन उदघाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी गणपतलाल मुथा होते. यावेळी गटविकास अधिकारी अनंत रदेशी,गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,उपाध्यक्ष अशोक साळुंके, सचिव अॅड. शरद सोमाणी, विश्वस्त बापूसाहेब पुजारी,राजेंद्रप्रसाद खटोड,राजेश खटोड,हरिचंद्र महाडिक,शेखर डावरे,प्राचार्य श्रीराम कुंभार, उपप्राचार्या सुनीता ग्रोव्हर, सूर्यकांत डावखर, गणित विज्ञान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रकटे, विजय नान्नर, सचिव वासुदेव गायके, मनीषा थोरात,आदिक,दिलीप दुधाळ आदी उपस्थित होते.
गटविकास अधिकारी अनंत परदेशी म्हणाले, या गणित विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजनासाठी अधिकारी पदाधिकारी,सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व बाल वैज्ञानिक यांनी झोकुन देऊन काम केले. तर शाळा समिती अध्यक्ष बापूसाहेब पुजारी म्हणाले,ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गावागावात विज्ञान उपकरणे तयार करून ते सर्वांसाठी खुले ठेवले पाहिजे.प्रास्तविक प्राचार्य श्रीराम कुंभार यांनी केले.सूत्रसंचालन प्रा विकास बनकर यांनी, तर आभार प्रा. नामदेव मोरगे यांनी मानले.
सावरकरांनी विज्ञाननिष्ठ हिंदुत्वाचा विचार दिला
भारत स्वातंत्र झाल्यावर सैनिक लागतील, म्हणून जय जवान हा मंत्र, तर आपला देश कृषिप्रधान असल्याने जय किसानचा मंत्र तर विज्ञानाच्या आधारावर देशाची सर्वांगीण प्रगती साधली जाणार असल्याने जय विज्ञानचा मंत्र महत्वाचा आहे. मात्र त्यातही सावरकरांनी विज्ञाननिष्ठ हिंदुत्वाचा विचार दिल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.