आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउसळलेला भक्तीचा महासागर, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष, तोफांची सलामी व फटाक्यांची आतषबाजी करत श्री क्षेत्र देवगड येथे दत्तजन्म सोहळा उत्साहात साजरा झाला. पारंपरिक प्रथेप्रमाणे दत्तजयंती निमित्त भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीस गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते व उत्तर अधिकारी प्रकाशानंद महाराज यांच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला. सदगुरू किसनगिरी बाबांच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक निघाली.
मिरवणुकीमध्ये गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या समवेत हातात भागवत धर्माची पताका घेतलेले, टाळ मृदृगाचा गजर करणारे भजनी सहभागी झाले. यज्ञ मंडपात झालेल्या श्री दत्त विष्णू यागाची भास्करगिरी बाबांच्या हस्ते पूर्णाहुती देऊन सांगता झाली. सायंकाळी भगवान दत्तात्रयांची मूर्तीचे विधिवत पूजन झाल्यानंतर जन्मोत्सव साजरा झाला. गुरुवर्य भास्करगिरी महाराज व इतर महाराजांच्या हस्ते यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.