आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यज्ञ सोहळ्याचे आयोजन:केडगावात श्रीराम कथा यज्ञ सोहळा

केडगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ब्राह्मण सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम कथा यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान अंबिकानगर (केडगाव) येथील श्री छत्रपती शिवाजी मंगल कार्यालयात हा सोहळा होणार आहे. यानिमित्त नगर शहरातील पाच मान्यवरांना ब्रह्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

रामकथा कार्यक्रमानंतर रोज ७० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या पाच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यात चित्रकला स्पर्धा, उखाणे स्पर्धा, प्रश्नमंजुषा, फॅन्सी ड्रेस, मॅचिंग स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदीचे आयोजन केले आहे. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता राघवेंद्र बुवा देशपांडे, सज्जनगड यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...