आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयामार्फत आयोजीत ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ ‘ स्पर्धेत अ.नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे श्रीराम विद्यालय राळेगण या विद्यालयास “ फाइव्ह स्टार” मानांकन हे विद्यालयाच्या नियोजनबद्ध गुणात्मक कामगिरीत मानाचा तुरा असून संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असल्याचे मत संस्थेचे सचिव जी.डी. खानदेशे यांनी व्यक्त केले आहे.
फाइव्ह स्टार मानांकन प्राप्त विद्यालयातील सेवकांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे विश्वस्त मुकेशदादा मुळे यांनी लोकसहभाग, संस्थेचे योगदान व शिक्षकांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.
नगर जिल्ह्यातील जवळपास ५००० शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या शाळांपैकी ग्रामीण भागातून राळेगणचे एकमेव विद्यालय या स्पर्धेत पात्र ठरल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नुकतेच पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी सोनसळे साहेब आणि गटशिक्षण अधिकारी बाबुराव जाधव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले होते.
श्रीराम विद्यालयाने या पूर्वी गुणवत्तेत सातत्य ठेवत मागील १५ वर्षात १४ वेळा शंभर टक्के निकालाची परंपरा राखली आहे. क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्यप्राप्त खेळाडू घडविले आहेत. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी यश मिळवत असून जिल्हा मराठा संस्थेचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार या पूर्वी तीन वेळा मिळवला आहे. शासनाच्या फाइव्ह स्टार रेटींगमुळे विद्यालयाच्या गुणात्मक व इतर आंतर-बाहय कामगिरीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
विद्यालयास फाइव्हस्टार रेटींग मिळालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सहसचिव ॲड विश्वासराव आठरे , खजिनदार डॉ विवेक भापकर, गावचे उपसरपंच सुधीर भापकर, बबनराव भापकर, भरत हराळ, सुभाष डावखरे, शरद कोतकर, संतोष हराळ, रविंद्र पिंपळे, राळेगण ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले. या सत्कार प्रसंगी मुख्याध्यापिका तारका भापकर, राजश्री जाधव, विजय जाधव, बाळासाहेब पिंपळे, राजेंद्र कोतकर, हरीभाऊ दरेकर, संजय भापकर, सुजय झेंडे, निळकंठ मुळे, अरविंद कुमावत, बाळासाहेब कुताळ, विशाल शेलार, रामदास साबळे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.