आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळबागेचा बहर:76 हजार 172 हेक्‍टरवर फळबाग लागवड, फळबाग लागवडीत श्रीगोंदे तालुका आघाडीवर, सर्वाधिक क्षेत्रावर डाळिंब बागा

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

साखर कारखानदारीचा जिल्हा म्हणून तशी अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्याने फळबाग लागवडीतही आघाडी घेतली. इतर पिके वगळून शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड केली असून यामध्ये सर्वाधिक क्षेत्र डाळींबाखालील आहे. नगर जिल्ह्यात आत्तापर्यंत 76 हजार 172 हेक्‍टरवर विविध फळबागांची लागवड झाली. जिल्ह्यात श्रीगोंदे तालुक्यात सर्वाधिक 15 हजार 309 हेक्‍टरवर फळबागा आहेत. तर सर्वात कमी श्रीरामपूर तालुक्यात 1167 हेक्‍टरवर फळबाग आहेत.

नगर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 17 लाख हेक्टर आहे. यापैकी लागवडीलायक क्षेत्र 13 लाख 59 हजार हेक्टर आहे. यात खरीपाचे सरासरी क्षेत्र 4 लाख 78 हजार हेक्टर, तर रब्बीचे क्षेत्र 6 लाख 45 हजार हेक्‍टर आहे. मुळा, भंडारदरा, निळवंडे या धरणांमुळे बागायती क्षेत्र 3 लाख 58 हजार हेक्टर आहे. फळबाग नगदी पीक असल्यामुळे शेतकरी आता फळबाग लागवडीकडे वळला आहे.

फळबाग लागवडीत श्रीगोंदे तालुक्याने आघाडी घेतली असून 15 हजार 309 हेक्टरवर विविध फळबाग आहेत. यात सर्वाधिक क्षेत्र 5 हजार 633 हेक्टर लिंबू पिकाचे आहे. नगर तालुक्यात 8 हजार 769 हेक्टरवर फळबागा असून यात डाळिंब आणि संत्र्याचे सर्वाधिक क्षेत्र आहे. पाथर्डी तालुक्यात 8 हजार 285 हेक्टर, राहाता 7 हजार 219 हेक्टर, संगमनेर 7 हजार 731 हेक्टर, कर्जत 6 हजार 882 हेक्टर, जामखेड 4 हजार 156 हेक्टर, पारनेर 3052 हेक्टर, नेवासे 3 हजार 168 हेक्टर, अकोले 3027 हेक्टर, कोपरगाव 3102 हेक्टर, राहुरी 2672 हेक्टर, शेवगाव 1636 हेक्टर, तर सर्वात कमी श्रीरामपूर तालुक्यात 1167 हेक्टरवर फळबागा आहेत.

सर्वाधिक 37 हजार 677 हेक्टरवर डाळींब

नगर जिल्ह्यात सर्वाधिक 37 हजार 677 हेक्टरवर डाळिंबाच्या बागा आहेत. लिंबू 12 हजार 462 हेक्टर, संत्रा 6 हजार 881 हेक्टर, आंबा 6 हजार 758 हेक्टर, पेरू 3 हजार 990 हेक्टर, द्राक्षे 2 हजार 783 हेक्टर, सीताफळ 2 हजार 199 हेक्टर, चिकू 1412 हेक्टर, मोसंबी 1095 हेक्टर, केळी 486 हेक्टर, नारळ 103 हेक्टर, बोर 110 हेक्टर, चिंच 79 हेक्टर, आवळा 79 हेक्टर, अंजिर 13 हेक्टर, पपई 25 हेक्टरवर फळबागा आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.

डाळिंब, द्राक्षाची होते निर्यात

नगर जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात डाळिंब व द्राक्षाची निर्यात केली जाते. त्याचबरोबर लिंबू, संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू या फळांना ही देशभरात मागणी आहे. नगदी पीक असल्यामुळे जिल्ह्यातील फळबाग लागवडीत दरवर्षी वाढ होत आहे. नगर जिल्ह्यात आंबा व सिताफळाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...