आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रोत्सव:श्रीकाळभैरवनाथांचा यात्रोत्सव उत्साहात; पालखी मिरवणुकीचा मान युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांना

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भराड गल्ली येथे काळभैरवनाथ देवस्थान येथे काळभैरवनाथ यात्रा नुकतीच मोठ्या उत्साहात झाली. यावेळी पालखीचा मान युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांना देण्यात आला. गणेश झिंजे, सुजित हाराळे, विशाल दगडे, मनोज हाराळे, सागर हराळे, नाना ढोरजे, रणजित परदेशी, सुधीर वखारे, राहुल हराळे, अमित हाराळे, सुकेश परदेशी, ऋषिकेश क्षीरसागर, बाळा कांबळे यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, दरवर्षी कालभैरवनाथ देवस्थान यात्रेत यापूर्वी पालखी उचलण्याचा मान आमचे वडील अनिल राठोड यांना दिला जात असे, ही परंपरा आजही सुरू आहे, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी काळभैरवनाथ देवस्थानचे सर्व सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार मानतो. हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करू, असे सांगितले. याप्रसंगी गणेश झिंजे यांनी काळभैरवनाथाचा महिमा सांगून देवस्थानकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सुजित हराळे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...