आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहितीचे आदानप्रदान:अभिनवच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या देशांसोबत करार करणार ; नवले

अकोले11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील अभिनव शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसोबत इंडोनेशियातील महम्मादिया विद्यापीठासोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार तेथील शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, कौटुंबिक गोष्टींवर अभ्यास करण्याची उत्तम संधी अभिनव संकुलातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष इंडोनेशियात जाऊन घेतली. दौऱ्यात शैक्षणिक विषयांसह माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत व उपयुक्त माहितीचे आदानप्रदान करता आले.

भविष्यात देखील अभिनव शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना अपडेट ठेवण्यासाठी इतर महत्त्वपूर्ण देशांसोबत सामंजस्य करार वाढवण्याबाबत सकारात्मक आहे, अशी ग्वाही देऊन अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले यांनी इंडोनेशियातून मायदेशी परतलेल्या शिष्टमंडळाचे स्वागत करून अभिनंदन केले.

अभिनवने इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील महम्मादिया विद्यापीठासोबत सामंजस्य करार केल्यानंतर १ ते १० नोव्हेंबरपर्यंतच्या अभ्यास दौऱ्यावर अभिनवचे ७ सदस्यीय शिष्टमंडळ गेले हाेते. यात एमबीए महाविद्यालयाचे विद्यार्थी दर्शन लांडगे व शुभम वाकचौरे, वसुंधरा अकॅडेमीचे विद्यार्थी सोहम डोंगरे व गौरी एखंडे, मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलचा विद्यार्थी स्पर्श वाकचौरे, वसुंधरा अकॅडेमीच्या प्राचार्य जेनी प्रसाद, प्रीस्कूलच्या प्राचार्य राधिका नवले यांचा समावेश होता. या कार्यक्रमात इंडोनेशियात जाण्यास मिळालेली संधी, त्याबाबत कुतूहल, अकोले ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व तेथून इंडोनेशियात गेल्यावर विद्यार्थ्यांना आलेले अनुभव, भारतीय चलन व इंडोनेशिया चलनातील मूल्यांचा फरक, महम्मदिया विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थी व पदाधिकारी संवाद साधतानाचा आत्मविश्वास, याबाबत अनुभव कथन केले.

अभिनव शिक्षण संकुलातील नालंदा हॉलमध्ये हे सादरीकरण करण्यात आले. यावेळी दौऱ्यात सहभागी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले. कार्यक्रमास अभिनव शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्य डॉ. जयश्री देशमुख, प्राचार्या अल्फोन्सा डी., विक्रम नवले, आंतरराष्ट्रीय सल्लागार डॉ. कीर्ती लोंगणी, डॉ. प्रिती शर्मा, आकाश लोंगाणी यांच्यासह अभिनव संकुलातील सर्व विभागांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, आंतरराष्ट्रीय समिती सदस्य उपस्थित होते. डॉ. कीर्ती लोंगाणी व डॉ. जयश्री देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी परदेशात अभिनवचा नावलौकिक वाढविल्याबद्दल कौतुक केले. एसआरव्ही सहभागी सदस्यांना प्रमाणपत्र वितरण झाले. सूत्रसंचालन प्रा. विनोदकुमार पठाडे यांनी केले. प्रास्ताविक राधिका नवले यांनी, तर आभार प्रा. शोएब शेख यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...