आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:नगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट; 258 नवे रुग्ण, रिकव्हरी रेट 97.33 टक्क्यांवर

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांमध्ये कडक लॉकडाऊन लागू केल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात वाढत चाललेली रुग्णसंख्या निम्म्यावर आली. शुक्रवारी जिल्ह्यात ४५८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. शनिवारी दिवसभरात २५८ नवे रुग्ण आढळले. सक्रिय रुग्णांची संख्या २,४३९ आहे.

शनिवारी जिल्ह्यात ३७७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. कोरोनामुक्तांची एकूण संख्या ३ लाख ४२,४८७ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ९७.३३% झाले. शनिवारी जिल्हा रुग्णालयाची कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८५, खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत १३९ व अँटिजन चाचणीत ३४ रुग्ण आढळले. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ४२, ४८७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या एकूण २,४३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये दहापेक्षा अधिक रुग्ण असल्याने लॉकडाऊन जाहीर केले होते. आठवडाभरानंतर पुन्हा या गावांचा आढावा घेत काही गावांतून लॉकडाऊन मागे घेण्यात आले. सध्या २१ गावांमध्ये रुग्णसंख्या दहापेक्षा अधिक असल्याने लॉकडाऊन आहे.

बातम्या आणखी आहेत...