आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रौप्य महोत्सव:लांडेवाडी येथे रौप्य महोत्सवी सप्ताह सुरू; सोमवारी समारोप

श्रीरामपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बालब्रम्हमचारी माधवबाबांचे कार्य खूप मोठे असून त्यांचा भक्त परिवार मोठा आहे. लांडेवाडी गावाने त्यांच्या स्मृती जागृत ठेवल्याने नवीन पिढीला त्यांच्या अध्यात्मिक कार्याची ओळख राहील. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा नव्या पिढीने आदर्श ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी केले.

लांडेवाडी येथील बालब्रम्हमचारी माधवबाबा लांडेवाडीकर यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त निवृत्ती महाराज लांडेवाडीकर यांच्या अधिपत्याखाली रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला असून सोमवारी समारोप होत आहे. या सप्ताहास देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी भेट देऊन आशीर्वाद दिला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गोपाळगिरी महाराज, माधवानंद उंडे महाराज, पंढरीनाथ तांदळे महाराज उपस्थित होते.

सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण गावात सडारांगोळी, स्वागत कमानी, भगवे झेंडे व पताकांची सजावट करून भक्तीमय वातावरण करण्यात आले. या सप्ताहाची सुरुवात अनिल महाराज पाटील यांच्या कीर्तनाने झाली असून आतापर्यंत बंडातात्या कराडकर, संदीपान महाराज, महादेव महाराज राऊत, उमेशजी महाराज दशरथे यांची कीर्तनसेवा झाली. पांडुरंग महाराज घुले, ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे, तर सोमवारी १६ रोजी पांडुरंग गिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.