आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीना नदीच्या महापुराचा फटका:अहमदनगरमध्ये शेकडो एकर शेती जलमय; ऊस, मक्याची पिके वाहून गेली

अहमदनगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीना नदीला शुक्रवारी पहाटे आलेल्या महापुराने नगर तालुक्यातील सीना काठावर असणाऱ्या बुरुडगाव, वाकोडी या गावांना मोठा फटका बसला. सीना काठी असणारी शेकडो एकर शेती जलमय झाली. शेतातील पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामेे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

पिके वाहून गेली

शुक्रवारी पहाटे सीना नदीला आलेला महापूर अहमदनगर शहरवासीयांनी अनुभवला. सीना काठच्या अनेक नागरी वसाहतींमध्ये पाणी शिरले. लोकांचे मोठे हाल झाले. त्यापेक्षाही जास्त नुकसान नगर तालुक्यातील गावांमध्ये झाले आहे. सीना काठावर असणाऱ्या बुरुडगाव, वाकोडी या गावामधील नदीकाठच्या शेतात आणि वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरल्याने आणि पाण्याला जोर असल्याने ऊस, मका , घास यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. पिके वाहून गेली.

घरांना पाण्याचा वेढा

नदीकाठी असणाऱ्या वस्त्यांमध्ये पाणी घुसले अनेक तास घरांना पाण्याचा वेढा होता. पुढील अनेक दिवस शेतात जाणेही आता शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. या भागातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बुरुडगावच्या सरपंच अर्चना कुलट, बापूसाहेब कुलट, नवनाथ वाघ, किशोर कुलट, महेश निमसे, सोमनाथ तांबे, अरुण शिंदे, नंदू जाधव, तसेच वाकोडीमधील बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डीले, बाळू गवळी, बच्चू मोढवे, शिवाजी गवळी, बाळू मोढवे, जगन्नाथ गवळी, सुदाम गवळी, यांनी केली आहे.

एकरी ५० हजार नुकसान भरपाई देण्याची मागणी

बुरुडगावच्या सरपंच अर्चना कुलट यांनी सांगितले की, सीना नदीचे पात्र बुरुडगावातून जाते. नदीकाठी एकाडे मळा, जाधव मळा, म्हस्के मळा, वाघ मळा अशा अनेक वस्त्या आहेत. महापुराचा मोठा फटका बुरुडगावला बसला आहे. उभी पिके वाहून गेली आहेत. शुक्रवारी दिवसभर अनेक वस्त्या पाण्यात होत्या. कोणताही प्रशासकीय अधिकारी इकडे फिरकला देखील नाही. तातडीने पंचनामे करून एकरी ५० हजारांची मदत द्यावी.

बातम्या आणखी आहेत...