आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ प्रतिपादन:प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न वाया जात‎ नाहीत : महंत अरुणनाथगिरी महाराज‎

राहुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

या जगात प्रामाणिकपणे सुरू ठेवलेले प्रयत्न‎ वाया जात नाहीत. राहुरीच्या विश्वमनी संस्थेच्या‎ अल्पकाळात तब्बल आठ शाखा उभ्या राहिल्या हे‎ विश्वासहर्तेचे प्रतीक असून भविष्यात या संस्थेच्या‎ शाखांचा विस्तार मोठ्या प्रमाणात होईल, असे‎ प्रतिपादन अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती‎ अरुणनाथगिरी महाराज यांनी केले. तालुक्यातील‎ म्हैसगाव येथे विश्वमनी संस्थेच्या ८ व्या शाखेच्या‎ उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विश्वमनी संस्थेचे‎ चेअरमन गणेश रमेश गोपाळे म्हणाले, नगर जिल्ह्यात‎ राहुरी, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुक्यात‎ विश्वमणी संस्थेच्या आठ शाखा कार्यरत आहेत.‎

अल्पकालावधीत ठेवीदारांचा विश्वास संपादन करत‎ संस्थेने सुमारे दहा कोटींच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केलेला‎ असून २१ कोटी रुपयांच्या ठेवीकडे वाटचाल सुरू‎ आहे. ठेवीदारांच्या विश्वासाला कदापी तडा जाऊ‎ देणार नाही, अशी ग्वाही देत आभार मानले. यावेळी‎ केदारेश्वर देवस्थानचे लक्ष्मण महाराज पांचाळ,‎ भगवान महाराज यमगर, सरपंच रुपाली दुधाट,‎ उपसरपंच सुभाष मुसळे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...