आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Sir D.M. Of Sangamner. Resolution Banning Mobile Use By Students In Petit College; Parents Should Visit The College To Inquire About The Child's Progress; Principal Free| Marathi News

शैक्षणिक:संगमनेरच्या सर डी.एम. पेटिट महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या मोबाइल वापरावर बंदीचा ठराव; पालकांनी कॉलेजमध्ये येऊन पाल्याच्या प्रगतीची चौकशी करावी ; प्राचार्य मोकळ

संगमनेर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सर डी. एम. पेटिट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापर व दुष्परिणामांबाबत जाणीव करून देत विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्याचे आवाहन केले. आवाहनाला प्रतिसाद देत सर्व पालकांनी ठराव मंजूर केला. प्राचार्य एच. आर. मोकळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या पालक मेळाव्याला पर्यवेक्षिका डॉ. अस्मिता देशपांडे, इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड, उपाध्यक्ष बबनराव जगताप, सहसचिव मनोज कोरडे, मेघा बटवाल, शिक्षक व पालक उपस्थित होते.

ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविकात प्रा. दशरथ गभाले यांनी विविध शालेय ठरावांचे वाचन केले. सर्व ठरावांना पालकांनी हात उंचावत मंजुरी दिली. अध्यक्ष प्राचार्य एच. आर. मोकळ, उपाध्यक्ष बबनराव जगताप, सचिव प्रा. गुलाब गायकवाड, सहसचिव मनोज कोरडे, मेघा बटवाल, प्रा. दशरथ गभाले (शिक्षक प्रतिनिधी), पालक वर्गप्रतिनिधी साबीर शेख, प्रा. एस. आर. चिमणकर, प्रा. एन. ए. शिंदे, मच्छिंद्र थिटमे, प्रा. ए. आर. टेमकर, बाळासाहेब भागवत, प्रा. एस. व्ही. शिंदे, नवनाथ आहेर, दत्तात्रय दराडे, प्रा. यू. ए. जाधव, माधव एरंडे, प्रा. भाऊसाहेब मांढरे आदींची यावेळी नूतन कार्यकारिणीवर निवड करण्यात आली.

चार्य मोकळ म्हणाले, पालकांनी वेळोवेळी कॉलेजमध्ये येऊन पाल्याच्या प्रगतीविषयी चौकशी करावी. शिक्षक-पालक संवाद असेल तरच विद्यार्थ्यांची अभ्यासाविषयी पालकांना माहिती कळते, असे सांगून कॉलेजच्या शालेय उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली. माधव एरंडे, उपाध्यक्ष बबनराव जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. रुपाली देशमुख यांनी केले. आभार प्रा. नलिनी शिंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संतोष धुळे, रविंद्र खाटेकर, मनिषा खाटेकर यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...