आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार राघव चड्डा म्‍हणाले:सिसोदिया भाजपत गेल्यास मुक्त होतील

शिर्डी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपचे नेते मनीष सिसोदिया यांना भाजपच्या तपास यंत्रणांनी अटक केलेली आहे. जर त्यांनी भाजपत जाण्यासाठी होकार दिला, तर त्यांच्या विरोधातील सर्व कारवाया बंद होऊन त्यांना तुरुंगातून मुक्त केले जाईल का? या देशात काय चालले आहे? असा सवाल आपचे खासदार राघव चड्डा यांनी केला.

ते म्हणाले, यापूर्वी काँग्रेसचे हेमंत मिश्रा, तृणमुलचे मुकुंद रॉय, बंगालचे सुवेंदू अधिकारी यांच्यावर वेगवेगळे आरोप ठेवण्यात आले. चौकशा, कारवाया झाल्या. मात्र त्यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर सगळ्या चौकशा थांबल्या. आरोप माफ केले. हा भाजपचा हा इतिहास आहे, असा आरोपही खासदार चड्डा यांनी केला. राघव चड्डा यांनी शनिवारी साईदरबारी हजेरी लावली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी देश सध्या कठीण व आव्हानात्मक काळातून जात असल्याचा आरोप केला. भाजप विरोधी पक्षांना विशेषत: आम आदमी पार्टीवर सातत्याने हल्ले करत आहे.

बातम्या आणखी आहेत...