आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:टाकळीभान येथे घरकुलासाठी ठिय्या आंदोलन ; ग्रामपंचायत प्रशासनाला कामकाज करू देणार नाही

टाकळीभान16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरकुलाच्या यादीत राजकीय द्वेषाने प्रेरित होऊन पात्र लाभार्थ्यांना डावलून मर्जीतील सधन कुटुंबाची नावे सामाविष्ट करुन गोरगरीबांवर ग्रामपंचायत प्रशासनाने अन्याय केला आहे. त्यामुळे घरकुल यादीचा फेरसर्वे करावा अन्यथा ग्रामपंचायत प्रशासनाला कामकाज करू देणार नाही, असा इशारा माजी सभापती नानासाहेब पवार यांनी दिला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरु केलेल्या ठिय्या आंदोलनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे माजी चेअरमन मधुकर कोकणे होते. घरकुलांच्या याद्या करताना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घोळ घातला असल्याचा आरोप यादीतील वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांनी केलेल्या संतप्त लाभार्थ्यांनी माजी सभापती नानासाहेब पवार यांच्याकडे तक्रारी केल्याने घरकुल यादीचा फेरसर्वे व्हावा या मागणीसाठी पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पवार म्हणाले, ग्रामपंचायत प्रशासनाने घरकुलाचा सर्वे करताना कार्यालयात बसुनच लाभार्थी यादी तयार केली आहे. त्यामुळे गरीब व गरजू लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहिले आहे. ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामविकास आधिकारी यांनी सत्तेचा दुरुपयोग केला आहे. घरकुलांच्या बाबतीत गोरगरीबांवर झालेल्या अन्याय सहन करणार नाही. सरपंच अर्चना रणनवरे यांनी निवेदन स्वीकारले व फेरसर्वेसाठी नवनोंदणी सुरु करणार आसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी अविनाश लोखंडे, कृष्णा वेताळ, मुकुंद हापसे, भरत गुंजाळ, सुप्रिया धुमाळ, रमेश धुमाळ, शिवाजी धुमाळ आदी उपस्थित होते. घरकुल आंदोलनावेळी उपसरपंच कान्होबा खंडागळे गट अलिप्त होता ते आंदोलनस्थळी आलेच नाही.

बातम्या आणखी आहेत...