आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर शहर व उपनगरात संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांच्या सुमारे साडेसहा हजार लाभार्थी गेल्या दोन महिन्यांपासून अनुदानापासून वंचित आहेत. हे अनुदान लवकर देण्याची मागणी होत आहे.
हे अनुदान रखडले
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, विधवा, दिव्यांग निवृत्तीवेतन या विविध योजनांच्या लाभार्थींना एप्रिल महिन्यापासून अनुदान मिळाले नाही. लाभार्थी अनुदान जमा झाले की नाही याची चौकशी करण्यासाठी बँकेत चकरा मारत आहेत.
महिना हजार मिळतात
सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाकडून निराधारांना विविध योजनेअंतर्गत महिन्याला एक हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. अहमदनगर शहरात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, विधवा ,दिव्यांग निवृत्तीवेतन या विविध योजनांचे 6 हजार 500 लाभार्थी आहेत.
1 कोटी जमा नाही
अहमदनगर शहर व उपनगरातील 6 हजार 500 विविध योजनेतील लाभार्थींच्या बँक खात्यात प्रत्येकी एक हजार रुपयाचे अनुदान जमा होते. या लाभार्थींसाठीचे एप्रिल महिन्यातील 51 लाख 42 हजार 660 व मे महिन्यातील 51 लाख 42 हजार 660 असे एक कोटींचे अनुदान अद्याप जमा झालेले नाही.
अधिकारी म्हणतात...
जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या उपलेखापाल कविता कोमार यांनी या लाभार्थींचे एप्रिल व मे महिन्यापासूनचे अनुदान आलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान गेल्या दोन महिन्यापासून निराधारांना सरकारी अनुदान मिळत नसल्याने अनेक वृद्ध व योजनेचे लाभार्थी बँक खात्यात अनुदान जमा झाले की नाही याची चौकशी करण्यासाठी जात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.