आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:तीन गावठी कट्ट्यांसह सहा काडतुसे जप्त

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हार (ता. राहाता) येथे विक्री करण्याचे उद्देशाने ३ गावठी कट्टे व ६ जिवंत काडतूस बाळगणारे दोन सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून ९१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रविंद्र भाऊसाहेब थोरात (वय ३०, रा. कुरणपुर, ता. श्रीरामपूर) व बाळासाहेब भिमराज थोरात (वय ५९, रा. कोल्हार, ता. राहाता) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई सुरू आहे. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना कोल्हार येथे दोन इसम गावठी कट्टे व जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील दिनकर मुंडे, सोपान गोरे, भाऊसाहेब काळे, मनोहर शेजवळ, विजय वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, लक्ष्मण खोकले, संदीप दरदंले, रणजीत जाधव व भरत बुधवंत यांच्या पथकाने गोसावी वस्ती, कोल्हार येथील एका पत्र्याच्या शेड जवळ सापळा रचला. आरोपींना ताब्यात घेण्याच्या तयारीत असतांना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकातील अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे तीन गावठी बनावटीचे कट्टे व सहा जिवंत काडतूस आढळून आले. पोकॉ रणजीत पोपट जाधव यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी रविंद्र भाऊसाहेब थोरात हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुध्द नगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दरोड्याची तयारी, सदोष मनुष्यवध, मोटर व्हेईकल व आर्म ॲक्टनुसार ७ गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी, सोनई, श्रीरामपूर शहर, लोणी, कोतवाली आदी पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...