आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरिपाच्या पिकांसाठी पाऊस उपयुक्त:निम्न दुधना प्रकल्पातील सहा दरवाजे उघडले ; दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

परतूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी दुपारनंतर हजेरी लावल्या नंतर रविवारी देखील पावसाने हजेरी लावली.दरम्यान, खरिपाच्या पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याने शेतकरी वर्ग समाधानी दिसत आहे. दरम्यान, निम्न दुधना प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे.गणेशोत्सव काळात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने गणेश विसर्जनानंतर मात्र हजेरी लावणे सुरू केले आहे. शहर परिसरात शनिवारी जोरदार पाऊस कोसळला.त्यानंतर रविवारी देखील पावसाने हजेरी लावली. खरीप हंगामातील पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणारा आहे. निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने शनिवारी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते. संततधार पावसामुळे पाण्याची आवक वाढल्याने रविवारी आणखी चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. आता एकूण सहा दरवाजाद्वारे ६ हजार ६० क्यूसेक दराने विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षातर्फे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...