आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:अंभोरे यांच्या चित्रांत मानवी जगाचं रेखाटन ; डॉ. शिंदे

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी जगाचं रेखाटन श्रीधर अंभोरे यांच्या चित्रांमध्ये आहे.ललितगद्य लेखनाची स्वतंत्र दृष्टी महावीर जोंधळे यांची आहे. ते त्यांनी आपल्या मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याने श्रीधररेषा या पुस्तकात मांडले आहे, असे प्रतिपादन डॉ. रणधीर शिंदे यांनी केले.आदीम संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्रकार अंभोरे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक महावीर जोंधळे लिखित श्रीधररेषा या पुस्तकाचे समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शब्दशिवार प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास मनोविकास प्रकाशनचे संचालक अरविंद पाटकर हे अध्यक्षस्थानी होते. श्रीधर अंभोरे, ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे, रवींद्र सातपुते, इंद्रजित घुले हे होते.

डॉ. शिंदे म्हणाले, ललितगद्य लेखनाची स्वतंत्र दृष्टी महावीर जोंधळे यांची आहे. ते त्यांनी आपल्या मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याने श्रीधररेषा या पुस्तकात मांडले आहे. कृष्णधवल किंवा काळ्या पांढर्‍या रंगाचा इतका सृजनशील आणि इतका परमउत्कर्ष वापर करणारे कलावंत रेखाटनामध्ये आपल्याला फार कमी दिसतात. श्रीधर अंभोरे यांच्या शैलीला पूर्वपरंपरेचं घराणं नाही आणि उत्तरकालीनही घराणं नाही, अशी स्वतंत्र रेषाशैली त्यांनी निर्माण केली. भव्यता आणि सूक्ष्मता यांच्यातलं नातं, द्वंद्व रेषेमध्ये पकडण्याचं सामर्थ्य आहे. अंभोरे यांच्या चित्रामध्ये ज्या पद्धतीमध्ये नेणीवेतील वाहते बंध चित्रांमध्ये सामावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदीम, प्राचीन आणि भारतीयत्व असलेले चेहरे रेखाटले आहेत. याप्रसंगी चित्रकार प्रमोद कांबळे, लेखक, कवी शशिकांत शिंदे, चित्रकार डेंगळे, नंदकुमार आढाव, लेखिका इंदुमती जोंधळे, जयंत येलूलकर, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, संध्या मेढे, प्रा. नवनाथ गुंड, युन्नुस तांबटकर, आबिद खान उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...