आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाहीला बळकटी देणारा निर्णय:प्रस्थापितांच्या घराणेशाही प्रवृत्तीला चपराक ; गोंदकर

शिर्डी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा लोकशाहीला बळकटी देणारा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने प्रस्थापितांच्या घराणेशाही प्रवृत्तीला चपराक लगावली आहे. सामान्य जनतेमधून नेतृत्व पुढे आल्यास ठराविक घराण्यांची राजकारणातील मक्तेदारी संपुष्टात येईल, या भीतीमुळे विरोधकांनी या निर्णयास विरोध सुरू केला असला, तरी हा निर्णय घेऊन जनतेच्या भावनांचा सरकारने आदर केला आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर म्हणाले.

सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात यावी अशी मागणी राज्यातील ९ हजार ग्रामपंचायतींनी ठराव करून केली होती. महाराष्ट्र सरपंच परिषदेनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. जनतेचीही तीच मागणी असतांंना या निर्णयास विरोध करून विरोधकांनी आपली घराणेशाही मानसिकता स्पष्ट केली असल्याचे गोंदकर यांनी सांगितले आहे.सामान्य जनतेतून नेतृत्वाचा उदय होऊ नये व सत्तेची सगळी केंद्रे आपल्या मुठीतच रहावी, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सतत प्रयत्न केले. आता जनतेच्या भावनांचा आदर करणारे सरकार सत्तेवर आले आहे. या निर्णयावर गोंदकर यांनी समाधान व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...