आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कत्तलखाना:कत्तलखान्यातील ॲनिमल वेस्टही आता नाल्यांमध्ये!

नगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महापालिका प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष, पावसाळा तोंडावर; नालेसफाईला मुहूर्त मिळेना

शहरातील बहुतांश नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचला आहे. महापालिकेचे नालेसफाई अद्यापही ही निविदा प्रक्रियेतच रखडली आहे. त्यातच ओपन नगर परिसरातील बहुतांशी नाल्यांमध्ये आता कत्तलखाने, हॉटेलमधील ॲनिमल व आणून टाकले जात असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वीच होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने महापालिकेकडून कार्यवाही अपेक्षित आहे. मात्र पावसाळा तोंडावर आला तरी महापालिकेकडून नालेसफाई अद्यापही सुरू झालेली नाही. नाल्यांमध्ये कचरा साचलेला आहे. वेळेत नालेसफाईचे काम मार्गी न लागल्यास पावसाळ्यामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

तसेच शहर व उपनगर परिसरातील बहुतांशी नाल्यांमध्ये कत्तलखाने व हॉटेलमधील ॲनिमल वेस्ट आणून टाकले जात आहे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली. ॲनिमल वेस्ट संकलनासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था असतानाही नाल्यांमध्ये म्हणून टाकले जात आहे महापालिका प्रशासनाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...