आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Slogan Of 'Unity' To Fight On Teachers Bank Self reliance; In The Last Election, Aikya Mandal Had Gone To The Grand Alliance With Goodwill |marathi News

रणधुमाळी:शिक्षक बँक स्वबळकावर लढण्याचा ‘ऐक्य’चा नारा; मागील निवडणुकीत सदिच्छाबरोबर महाआघाडीत गेले होते ऐक्य मंडळ

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या मागील निवडणुकांत सदिच्छा मंडळाच्या महाआघाडी एक्सप्रेसमध्ये सहभागी झालेले ऐक्य मंडळाने आगामी निवडणुकीत मात्र, स्वबळावर लढण्याची घोषणा राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी केली. नगरमध्ये झालेल्या एका बैठकीत ऐक्य मंडळाने हा निर्णय घेतला.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या मतदारांची यादी अंतिम झाली असून कोणत्याही क्षणी निवडणूक घोषीत होऊ शकते. यापार्श्वभूमीवर बँकेच्या राजकारणातील सक्रीय संघटना व मंडळांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ प्रणित ऐक्य मंडळाची प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हा बैठक एमआयडीसीत जिमखाना येथे मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी शिक्षक संघाचे राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे, राज्यउपाध्यक्ष सुनिल जाधव, राज्य संघटक राजेंद्र निमसे, सर्जेराव राऊत, संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, राजकुमार शहाणे, सुनिल शिंदे, शरद वांढेकर, विलास लवांडे, भाऊसाहेब घोरपडे ,शिवाजी ढाकणे, ज्ञानदेव कराड, प्रदीप चक्रनारायण, रज्जाक सय्यद, संदीप शेळके आदी उपस्थित होते. शिक्षकांचे प्रश्न सोडवल्याने सभासद मदत करतील, त्यामुळे शिक्षक बँकेची आगामी निवडणूक ऐक्य मंडळाने स्वबळावर लढवावी असा, निर्धार केल्याची माहिती राज्यसंघटक निमसे यांनी दिली. यावर सर्वाचे एकमत झाले.

कोणत्याही मंडळावर टीका करणार नाही
कोणत्याही संघटनेवर टीका न करता, राज्यस्तर व जिल्हा स्तरावरील केलेल्या संघटनात्मक कामाचा व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत घेतलेली भूमिका सभासदांसमोर मांडू. लवकरच मेळाव्याचे नियोजन करून बँके विषयक भूमिका व धोरण जाहीर केले जाईल, असे निमसे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...