आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाचे दुर्लक्ष:शहरातील नाल्यातील गाळ टाकला रस्त्याच्या कडेला; गाळ न उचलल्याने सुटली दुर्गंधी, अनेक नाल्यांमध्ये गाळ तसाच

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात महापालिकेकडून सुरू असलेली नालेसफाई अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पावसाळा तोंडावर आला असतानाही अद्याप अनेक नाल्यांमध्ये गाळ तसाच पडून आहे. दरम्यान, काही ठिकाणी नाल्यांमधून काढलेला गाळ रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कामे, नियोजन पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. मात्र, महापालिकेच्या नालेसफाईची निविदा रखडल्यामुळे उशिराने नालेसफाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळा तोंडावर आला असतानाही शहरातील बहुतांशी नाल्यांतील गाळ काढण्याचे काम प्रलंबित आहे.

महापालिकेने नाल्यांमधून काढलेला गाळ उचलण्यासाठी नियोजन न केल्यामुळे नाल्यांमधून काढलेला गाळ तसाच रस्त्याच्या कडेला पडून आहेत. परिणामी परिसरात दुर्गंधी सुटली आहे. महापालिकेच्या या भोंगळ कारभाराविरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळ न उचलल्यास तो पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...