आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतिमंद:स्नेहा महाजन यांनी  केले मतिमंद विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वासंती खंडागळे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नगर शहरात १९७८ साली मतिमंद मुलामुलींसाठी शाळा सुरू करून खूप मोठे काम केले. आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना या शाळेचा खूप फायदा झाला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांना शैक्षणिक व व्यवस्थापकीय अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात.

स्नेहा महाजन यांनी ३७ वर्ष मुख्याध्यापिका म्हणून उत्कृष्ट काम करत या दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थित हाताळल्या आहेत. मतिमंद विद्यार्थ्यांना शिकवणे हे अतिशय अवघड काम असते.

मात्र महाजन यांनी हे काम अतिशय चांगल्या प्रकारे करत मतिमंद विद्यार्थ्यांना घडवले आहे. म्हणूनच त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, असे गौरवोद्गार त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यात काढले.

बातम्या आणखी आहेत...