आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता वाढवली:जिल्ह्यात आतापर्यंत 28 जणांना स्वाईन ची बाधा

नगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा प्रादूर्भाव पूर्णपणे कमी झाला नसतानाच स्वाईनफ्लूच्या वाढत्या संख्येने चिंता वाढवली आहे. आतापर्यंत स्वाईन फ्लू बाधितांची संख्या २८ वर पोहोचली असून आतापर्यंत ८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने रूग्ण बाधीत आढळून आलेल्या भागात संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली आहे. आरोग्य विभागाकडे १ जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे २८ रूग्णांना स्वाईन फ्लूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तसेच ८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

बहुतांश रूग्ण संगमनेर तालुक्यातील असून, बाधित २७ रूग्णांपैकी या वर्षात पहिला मृत्यू १० ऑगस्ट २०२२ रोजी झाला. त्यानंतर १५ ऑगस्ट, २३ ऑगस्ट, २४ ऑगस्ट, १९ ऑगस्ट, २४ ऑगस्ट, २५ अऑगस्ट व २८ ऑगस्ट या दिवशी स्वाईन फ्लूमुळे रूग्णांचे मृत्यू झाले आहेत. सप्टेंबर महिन्यांत मृत्युचा आकडा कमी झाल्याचे दिसून येत आहे. ज्या भागात स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळून आले आहेत, त्या भागात प्राथमिक आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी मोहिम हाती घेण्यात आली होती. तसेच संपर्कातील व्यक्तींचीही तपासणी करण्यात येत आहे.

मागील तीन वर्षातील रूग्णसंख्या
जिल्ह्यात २०१९ मध्ये १ लाख ३३ हजार ६२८ रूग्णांची तपासणी झाली होती, त्यात ५३ रूग्ण पॉझिटिव्ह व १५ मृत्यू झाले होते. २०२० व २०२१ मध्ये कोरोनाचा फैलाव वाढला असताना, स्वाईन फ्ल्यु ने एकही मृत्यू झाला नाही. त्या कालावधीत कोरोनामुळे मृत्युचा आकडा मोठा होता. तर जानेवारीपासून आतापर्यंत २८ रूग्णांना स्वाईन फ्ल्युची बाधा झाली.

बातम्या आणखी आहेत...