आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार परिषद:…तर अधिकाऱ्यांना डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करू देणार नाही

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा समितीचा इशारा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे १४ एप्रिलला भूमिपूजन करावे, अन्यथा अधिकाऱ्यांना पुतळ्यास पुष्पहार अर्पण करू दिले जाणार नाही, असा इशारा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा समितीने शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. समितीने पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी समितीचे अजय साळवे, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, प्रतीक बारसे, बंडू आव्हाड, संजय कांबळे, प्रशांत गायकवाड, किरण दाभाडे, सोमा शिंदे, बंटी भिंगारदिवे, योगेश थोरात, सागर ठोकळ, नितीन खंडागळे, संतोष जाधव, संदीप वाघमारे उपस्थित होते.

बनसोडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपुजन १४ एप्रिलला झाले पाहिजे. अन्यथा कोणत्याही अधिकाऱ्याला तेथे फिरकू दिले जाणार नाही, असे सांगितले. अजय साळवे म्हणाले, आम्ही सर्वजण एकत्र येऊन जयंती साजरे करणार आहे. स्थापन केलेल्या समितीमार्फत पुर्णाकृती पुतळ्याचे डिझाईन पाहून ते अंतिम होईल. त्यात कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर समिती ते हाणून पाडेल, असे सांगितले.

नियोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा संघर्ष समिती पुढील प्रमाणे - अजय साळवे, रोहित आव्हाड, सुमेध गायकवाड, सुरेश बनसोडे, प्रतीक बारसे, संजय कांबळे, प्रशांत गायकवाड, राहुल कांबळे, किरण दाभाडे, सुशांत महस्के, सुनील शिंदे, योगेश थोरात, संतोष जाधव, नाथा अल्लाट, सुनील शेत्रे, सदाशिव भिंगारदिवे, वैभव कांबळे, सचिन शेलार, विशाल गायकवाड, प्रवीण चाबुकस्वार, जय कदम, सोमा शिंदे, विजय गायकवाड, संभाजी भिंगारदिवे, झेवियर भिंगारदिवे, अनिल शेकटकर, संजय जगताप, वृषाल साळवे, विशाल कांबळे, पिटू माघाडे. नियोजन व व्यवस्थापन समिती प्रमुख - बंटी भिंगारदिवे, सागर ठोकळ, नितीन खंडागळे, दिनेश पंडित, विवेक भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे. सोशल मीडिया प्रमुख - अमित काळे, योगेश साठे, संदीप राजापुरे, नाना पाटोळे, विशाल पवार, सर्पमित्र आकाश जाधव. प्रसिद्धीप्रमुख महेश भोसले, नितीन कसबेकर, सिद्धार्थ आढाव, संदीप वाघमारे, सचिन मोकळ. संयोजन समिती - भरत कांबळे, पवन भिंगारदिवे, सुजित घंगाळे, विशाल गायकवाड, कौशल गायकवाड, विवेक भिंगारदिवे, संतोष जाधव, मेजर राजू शिंदे, समीर भिंगारदिवे, अविनाश शिंदे, सुरज कांबळे, भाऊ साळवे, अक्षय भिंगारदिवे, प्रतिक जाधव, अविनाश भोसले, मनोज साठे, सिद्धार्थ पाटोळे, मनोज ठाकूर आदी. पत्रकार परिषदेला उपस्थित सुरेश बनसोडे, अजय साळवे,सुमेध गायकवाड, प्रतीक बारसे, बंडू आव्हाड, संजय कांबळे, प्रशांत गायकवाड, किरण दाभाडे, सोमा शिंदे, बंटी भिंगारदिवे, योगेश थोरात, सागर ठोकळ आदी.

समितीच्या माध्यमातून पुतळा उभारणीचा लढा
आंबेडकरी चळवळीतील विविध राजकीय पक्ष संघटनांनी आपले राजकीय जोडे बाजुला ठेवून पुर्णाकृती पुतळा स्थापन करण्यासाठी एकत्र येत कृती समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून पुतळा उभारणीचा लढा देण्यात येईल. शहराचे आमदार, महापौरांसह मनपाचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत आहे, असेही समितीच्यावतीने सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...