आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक:‘सोशल डिल्लेमा’ माहितीपट, ‘इन टू द वाईल्ड’ या सिनेमांचे प्रेक्षकांवर गारुड; प्रतिबिंब चित्रपट महोत्सवाला एक हजार रसिकांचा प्रतिसाद

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील न्यू आर्टस कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने आयोजित पंधराव्या प्रतिबिंब राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत आतापर्यंत १ हजार ७२ प्रेक्षकांनी हजेरी लावली आहे. ‘द सोशल डिल्लेमा’ या माहितीपटाने व ‘इन टू द वाईल्ड’ या सिनेमांनी तर प्रेक्षकांच्या मनात घर केले. मंगळवारी सकाळी या चार दिवसीय प्रतिबिंब चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अल्फान्सो कुअरान दिग्दर्शित ‘चिल्डरन्स ऑफ मेन’ हा सिनेमा, जेफ ओर्लोवस्की दिग्दर्शित ‘द सोशल डिल्लेम्मा’ हा माहितीपट, फिशर स्टीवन्स दिग्दर्शित ‘बिफोर द फ्लड’ हा माहितीपट आणि सीम पेन दिग्दर्शित ‘इन टू द वाईल्ड’ हे सिनेमे दाखवण्यात आले.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जोनाथन हुजेस दिग्दर्शित ‘लाईफ ऑन आवर प्लॅनेट’ व ल्यु जॅकेट दिग्दर्शित ‘मार्च ऑफ पेंगविन’ हे माहितीपट, तर ‘आईस एज’ आणि ‘वॉल ई’ हे सिनेमे दाखवण्यात आले. प्रत्येक माहितीपट आणि सिनेमा संपल्यानंतर संज्ञापन अभ्यास विभागाचे प्रमुख प्रा. संदीप गिऱ्हे यांनी त्यांची सखोल माहिती दिली. या महोत्सवात गुरुवार आणि शुक्रवारी विद्यार्थ्यांनी तयार केलेले माहितीपट आणि लघुपट दाखवले जाणार आहेत.

सिनेमा समाज घडवतो
सिनेमा हे समाजाचं प्रतिबिंब आहे असे म्हटले जाते. तसेच सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींचे अनुकरणही केले जाते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके यांनी केले. त्यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपप्राचार्य, संज्ञापन अभ्यास विभागाचे प्राध्यापक बापू चंदनशिवे, महोत्सचे संयोजक अभिजित गजभिये, आदी उपस्थित होते.

निसर्ग माणसाला जगणे शिकवतो
निसर्ग ही यंदाच्या चित्रपट महोत्सवाची आहे. या विषयावर आधारित माहितीपट आणि सिनेमे महोत्सवात दाखवले जात आहेत. निसर्ग माणसाला जगायला शिकवतो, असा संदेश देणारे सिनेमे पहायला मिळाले. सोशल मीडियाच्या अतिवापराचा धोका व परिणाम दाखवणारा ‘सोशल डिलेम्मा’ हा माहितीपट प्रेक्षकांना अधिक भावला.

बातम्या आणखी आहेत...