आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटका‎:सोनई पोलिसांनी छापा टाकून चांदा येथून‎ बावीस गोवंश जनावरांची केली सुटका‎

नेवाशा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदे येथे सोनई पोलिसांनी‎ छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या ३ लाख ६३‎ हजार रुपये किमतीचे गोवंश जातीची लहान, मोठे २२‎ जनावरांची सुटका केली. सुटका केलेली ही जनावरे‎ ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या‎ अन्नपाणी, निवारा व सुरक्षेसाठी संत जनाबाई‎ गोशाळा, हनुमान टाकळी, तालुका पाथर्डी येथे‎ पाठवण्यात आली.

या कारवाईमध्ये बाबू दाऊद शेख‎ (वय ३५), जावेद युसूफ शेख (वय ४४), हातिम‎ शब्बीर पठाण (वय २२, सर्व रा. चांदा, ता. नेवासे) या‎ एकूण तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.‎ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक प्रमाणे फिर्यादी पोलिस‎ कॉन्स्टेबल सचिन ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा‎ दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार राजेंद्र‎ औटी हे करत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक‎ राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर,‎ उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली‎ सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक‎ माणिक बी. चौधरी यांनी केली.‎

बातम्या आणखी आहेत...