आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्वप्रेमी:शंभूच्या निधनाने सोनेवाडी ग्रामस्थांसह अश्वप्रेमी शोकसागरात

कोपरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील अश्व प्रेमी सुनील गुडघे यांच्या ३६ महिन्याच्या घोड्याचे गॅस्ट्रो आजाराने निधन झाले. नगर, नाशिक, औरंगाबाद आदी जिल्ह्यात शर्यतीच्या मैदानावर एकदाही हार या घोड्याने पत्करली नव्हती. अनेक शर्यती जिंकत त्याने आपले चाहता वर्ग निर्माण केला होता. परंतु मंगळवारी रात्री अचानक झालेल्या गॅस्ट्रो आजाराने या अश्वाचे निधन झाले. रातोरात शंभूच्या निधनाची बातमी पसरतात सोनेवाडी ग्रामस्थांसह परिसरातील अश्वप्रेमी शोकसागरात बुडाले. बुधवारी सकाळी दहा वाजता शंभूच्या अंत्य दर्शनानंतर सुनील गुडघे यांच्या शेतातच शंभुला समाधिस्त करण्यात आले.

दोन दिवसांपूर्वीच शर्यतीचे मैदान गाजवून आल्यानंतर पुन्हा गुरुवारी शेतीला जाण्यासाठी शंभू व टीमची तयारी सुरू झाली होती मात्र मंगळवारी रात्रीच शंभूला अस्वस्थ वाटू लागले. मात्र गॅस्ट्रो झाल्याने उपचारादरम्यानच शंभूचा अंत झाला.

गुडघे कुटुंबाने मुलाप्रमाणेच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला शंभू आपल्यातून गेल्याने टाहो फोडला.वाऱ्यासारखी बातमी गावात पसरतात हजारो ग्रामस्थ व वैजापूर, संगमनेर, नाशिक, मालेगाव, नगर , कोपरगाव येथील अश्वप्रेमी शंभूच्या अखेरच्या दर्शनासाठी आले. पुणे येथील शर्यत जिंकल्यानंतर शंभूला ११लाख रुपयांची मागणी झाली होती. मात्र सुनील गुडघे यांनी शंभूची विक्री होणार नाही, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...