आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरणी:7.39 लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी; यंदा खरिपाच्या पेरणीत वाढ

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला असून आतापर्यंत २३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत ७ लाख ३९ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्यातील मुळा धरण ७५ टक्के तर भंडारदरा व निळवंडे धरणांतील पाणीसाठा ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाच्या बरसत असलेल्या श्रावणधारा खरिपासाठी दिलासादायक ठरत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात खरिपाचे अंदाजीत सरासरी क्षेत्र ६ लाख ७४ हजार ४६१ हेक्टर आहे, परंतु यंदा खरिपाच्या पेरणीत वाढ झाली असून तब्बल १०९ टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने खरिपासाठी खताचे नियोजन आखले असून आतापर्यंत १ लाख ६२ हजार मे.टन खत उपलब्ध झाले असून सद्यस्थितीत ५३ हजार २७९ टन खत शिल्लक आहे. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मुळा धरणात आतापर्यंत ७५.२१ टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच भंडारदरा ८७.३० तर निळवंडे ८१.४६ टक्के भरले आहे. या तिनही धरणांत पाण्याची आवक सुरू असून यंदा सिंचनाची चिंता मिटलेली आहे.,

तालुकानिहाय पाऊस
नगर २०४.३, पारनेर २०८.८, श्रीगोंदे २१२.७, कर्जत १७५.२, जामखेड २५६.९, शेवगाव २८९.६, पाथर्डी २४९.८, नेवास २४५.५, राहुरी २०७, संगमनेर २१७, अकोले ३९९, कोपरगाव १९९, श्रीरामपूर २०७, राहता १५९.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जायकवाडी ९०.८ टक्के
समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणानुसार टंचाई कालावधीत नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडले जाते. परंतु, यंदा जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत या धरणांत तब्बल ९०.८ टक्के पाणी असल्याची नोंद झाली.

धरणातून नदी पात्रात विसर्ग (क्युसेक्स)
भंडारदरा धरणातून ८२६, निळवंडे धरणातून १ हजार ५०, ओझर बंधारा १ हजार ३९२ क्युसेक्स वेगाने प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून १ हजार ६१४ वेगाने गोदावरीत विसर्ग सुरू आहे. भिमा नदी - दौंड पुल विसर्ग ७ हजार १६३ तर घोड धरणातून २ हजार ८० वेगाने विसर्ग सुरू.

पीक निहाय खरिप पेरणी (हेक्टर)
भात ३०६७, बाजरी ८३३१८, मका ६३३९१, तूर ४९५८९, मूग ४१२२१, उडीद ६२७२८, भुईमुग ४४३४, सोयाबिन १३६६३३, कापूस १२३४४७, कांदा ६२८४, ऊसलागवड ६२४६४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आतापर्यंत एकूण पेरणी सरासरी ७ लाख ३९ हजार ६४ हेक्टरवर झाली.

बातम्या आणखी आहेत...