आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरिपाची तयारी:अहमदनगरमध्ये 6.68 लाख हेक्टरवर होणार पेरणी; तूर, मूग, सोयाबीन, मक्याचे क्षेत्र वाढणार

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यात यंदा पाऊस वेळेवर आल्यास खरीप हंगामात तूर, मूग, उडीद, सोयाबीन व मका पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या खरीप हंगामात 6 लाख 68 हजार 535 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी होईल. त्‍यानुसार कृषी विभागाने तयारी केली असून खरिपासाठी लागणारे रासायनिक खतांची उपलब्धता केली आहे.

मशागतीची कामे उरकली

अहमदनगर जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी क्षेत्र 4 लाख 47 हजार 903 हेक्टर आहे. नगर जिल्हा पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून गणला जातो. त्यामुळे रबीच्या तुलनेत खरिपाचे क्षेत्र कमी आहे. रब्बीचे सरासरी क्षेत्र 7 लाख 20 हजार हेक्टर आहे. नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीची कामे उरकली असून ते आता पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

सर्वाधिक क्षेत्रावर कापूस

आगामी खरीप हंगामात तूर, मूग, उडीद, सोयाबीन, मका या पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. कापूस 1 लाख 28 हजार 137 हेक्टर, सोयाबीन 1 लाख 24 हजार 804 हेक्टर, तुरीची पेरणी 68 हजार 445 हेक्टरवर, मूग 57 हजार 913 हेक्टर, उडीद 83 हजार 401 हेक्टर, मका 71 हजार 888 हेक्टर, तर भाताचे पीक 18 हजार 808 हेक्टरवर असेल.

बाजरी पिकाच्या क्षेत्रात घट होणार असून 93 हजार 542 हेक्‍टरवर बाजरीची पेरणी होईल. मागील खरिपात 1 लाख 3 हजार 32 हेक्‍टरवर बाजरीची पेरणी झाली होती. त्यानंतर रागी, कारळे, सूर्यफूल या पिकांची पेरणी होणार आहे.

उत्पादकता 14.60 क्विंटल राहील

आगामी खरीप हंगामात जिल्ह्याची उत्पादकता हेक्‍टरी 14 क्विंटल 60 किलो राहील, असा अंदाज आहे. 2021-22 या वर्षात खरीप हंगामात 6 लाख 80 हजार 549 मेट्रीक टन उत्पादन झाले होते. उत्पादकता प्रति हेक्‍टरी 10 क्विंटल 93 किलो एवढी मिळाली होती. त्यामुळे अतिवृष्टी व अवकाळी पावसाचा खरिपाला फटका बसला होता ‌

तर खरीप क्षेत्रात वाढ होईल

खरीप हंगामासाठी यूरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते, एसएसपी आदी रासायनिक खतांची एकूण 2 लाख 75 हजार 505 टन मागणी केली. यातून 2 लाख 25 हजार 500 टन खताचे आवंटन झाले. 7 ते 15 जून या कालावधीत पाऊस झाल्यास तूर, मूग, उडीद, सोयाबीन, मका या पिकांच्या क्षेत्रात वाढ होईल. कापसाचे क्षेत्र स्थिर राहील. पाऊस वेळेवर वाढल्यास खरिपाच्या क्षेत्रात वाढ होईल.

- शिवाजीराव जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहमदनगर

बातम्या आणखी आहेत...