आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरिपाचे मोठे नुकसान:सोयाबिनला मिळाला 5  हजार 250  चा भाव

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी तालुक्यातील वांबोरी उपबाजारात भुसार मालाच्या मोंढ्यावर सोयाबिनला ५ हजार २५० रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. जिल्ह्यात एक नंबर कांद्याचे भाव ३ हजारीपार झाले आहेत. अतिवृष्टीमुळे खरिपाचे मोठे नुकसान झाले. शेतात पाणी साचून राहिल्याने उत्पादनात घट झाली आहे. ज्या ठिकाणी सोयाबिन हातात येऊ शकणार होते, तेथेही ऐन काढणीच्या काळात आलेला माघारीचा पाऊस नुकसानीत भर घालणारा ठरला.

आता टप्प्याटप्प्याने शेतकरी त्यांचे सोयाबिन बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. वांबोरीत बुधवारी ज्वारी २ हजार, बाजरी १ हजार ७०१, गहु ३ हजार १८६, हरभरा ३ हजार २०० तर सोयाबिनला ४ हजार ते ५ हजार २५० रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

बातम्या आणखी आहेत...