आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदल्यांचे रॅकेट:एसपी मनोज पाटील चौकशीच्या फेऱ्यात?; गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त शुक्ला यांनी दिला होता अहवाल, पाटील यांचे अहवालामध्ये नाव

नगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडाचा यशस्वीपणे तपास करणारे पोलिस अधीक्षक मनोज पाटील चौकशीच्या फेऱ्यात काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठे रॅकेट सक्रीय असून त्यात सोलापूरचे तत्कालीन तथा सध्याचे नगरचे पोलिस अधीक्षक पाटील यांचा समावेश असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिला होता. एसपी पाटील यांच्यासह राज्यातील २९ पोलिस अधिकाऱ्यांच्या या रॅकेटमध्ये समावेश असून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी देखील शुक्ला यांनी केली होती. याप्रकरणी पाटील यांचे नाव समोर आल्याने नगर पोलिस प्रशासनासह जिल्हाभर खळबळ उडाली आहे.

राज्यभर गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणामुळे पोलिस प्रशासन अडचणीत आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कथित भ्रष्टाचाराचे पुरावे नुकतेच केंद्रीय गृह सचिवांकडे सादर केले आहेत. त्यानंतर गुप्तचर विभागाच्या तत्कालिन आयुक्त यांनी मुख्य सचिवांकडे सादर केलेल्या बदल्यांच्या रॅकेटबाबतचा अहवाल देखील समोर आला आहे. त्यात शुक्ला यांनी राज्यातील २९ पोलिस अधिकाऱ्यांचा बदल्या रॅकेटमध्ये समावेश असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यात सोलापूरचे तत्कालिन तथा नगरचे सध्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचा देखील समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी शुक्ला यांनी मुख्य सचिवांकडे अहवालाद्वारे केली. शुक्ला यांचा हा अहवाल व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या खुलाशानंतर पोलिस अधीक्षक पाटील हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापूरहून नगरला बदली होऊन आलेले पाटील यांनी अल्पावधीत चांगली कामगिरी केली.

पोलिस वर्तुळासह जिल्ह्यात चर्चा
राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या झाल्या. लॉकडाऊन सुरू असतानाच पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगरचा पदभार स्वीकारला. त्यानंतर रेखा जरे हत्याकांडात तब्बल साडेतीन महिने एसपी पाटील यांच्यासह तपासी अधिकारी अजित पाटील यांनी तोंडावर बोट ठेवले होते. साडेतीन महिने शोध घेऊनही बोठेसारखा आरोपी का सापडत नाही, असा सवाल नगरकर वारंवार उपस्थित करत होते. बाेठेला पकडून अकरा दिवस झाले तरी पाेलिसांच्या हाती हत्याकांडाचे ठाेस कारण लागू शकले नाही. त्यातच अाता बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालात नाव गाेवल्याने चर्चेला उधाण आले आहे.

बातम्या आणखी आहेत...