आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्पाणी पुरवठा:विस्कळीत पाणी पुरवठ्याकडे सभापती बोरुडेंनी वेधले लक्ष

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभाग क्रमांक ८ मधील सावेडी गाव ते बालिकाश्रम रोड परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सदर परिसरातील वॉल लिकेज आहे. त्यामुळे पाण्याची गळती होत आहे. याबाबत तत्काळ सूचना देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे यांनी आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, खंडोबा मंदिर भागात पाणीपुरवठा करणारी नवीन पाइपलाइन टाकणे बाकी आहे. याबाबत संबंधीतांना आदेश देण्यांत यावे. याचबरोबर बालिकाश्रम रोड परिसराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करावा. ठिकठिकाणी असलेले लिकेज तातडीने दुरुस्त करावेत. त्यामुळे परिसरामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तर काही भागात कायमस्वरूपी व्हाॅल्व सतत चालू असतात. या संदर्भात तातडीने दाखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अन्यथा परिसरातील नागरिकांसमवेत आपल्या दालनात आंदोलन करण्याचा इशाराही पुष्पा बोरुडे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...