आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर विभागातील सर्वच पोस्ट ऑफिसमधून ९ व १० फेब्रुवारी या दोन दिवशी मुलींसाठी असणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेकरिता विशेष मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे. केडगाव टपाल कायार्लयातही या योजनेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुलींसाठी ही योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवावी यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले अाहे.
या योजनेच्या प्रसारासाठी केडगाव टपाल कार्यालयातर्फे विविध अंगणवाडी केंद्रास भेटी देत याची माहिती देण्यात आली. चास येथे नुकतीच अंगणवाडी सेविका व आरोग्यसेविका यांची बैठक घेऊन त्यांना या योजनेबाबत माहिती देण्यात आली. या योजनेंतर्गत दहा वर्षाखालील मुलीचे पालकांच्या द्वारे खाते उघडता येते. सुरवातीस २५० रुपये भरून खाते उघडता येते. शंभरच्या पटीत रक्कम भरता येईल. आर्थिक वर्षात किमान एक हजार तर कमाल दीड लाखाची मर्यादा आहे. पंधरा वर्षे या खात्यात रक्कम भरावी. खाते एकवीस वर्षांनी परिपक्व होते. मुलीच्या भविष्यासाठीची तरतूद असणारी योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जाते.
मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी योजनाआपल्या कन्येच्या सुरक्षित भविष्याच्या दृष्टीकोनातून शासनाने ही सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क करून आपल्या सुकन्या योजनेचे खाते उघडावे. संतोष यादव, पोस्टमास्तर, केडगाव.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.