आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:विद्यार्थ्यांना दाखले देण्यासाठी संगमनेर प्रांत कार्यालयाची विशेष मोहीम; प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांचे आवाहन

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील प्रांत कार्यालयातर्फे महा‌राजस्व अभियानांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे आवश्यक दाखले उपलब्ध करून देण्यासाठी १ ते १३ जून दरम्यान विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी केले आहे.

मोहीमेतंर्गत जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, डोमेसाईल, वय राष्ट्रीयत्व, अधिवास, डोंगरी दाखला आदी प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे आवश्यक दाखले दिले जाणार आहेत. कागदपत्रे काढताना येणाऱ्या अडचणी दूर करून किमान कागदपत्र व शासकीय शुल्क दरात कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने संगमनेर-अकोले तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांच्या सहकार्यातून शाळा, महाविद्यालयातच दाखले वितरीत करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. १ ते ४ जून या कालावधीत शिक्षक, विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले दाखल्यांची यादी तयार करून त्यासाठी लागणारे कागदपत्र, फी जमा करण्यात येणार आहे. ५ ते ६ जून रोजी सेतू चालक प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन प्राप्त झालेले अर्ज ऑनलाईन करण्याचे काम करणार आहेत.

७ ते १० जून दरम्यान प्रांत व तहसील कार्यालयाकडून ऑनलाईन दाखले तपासून मंजूर करण्याचे काम होणार आहे. १३ जून रोजी तालुक्यातील शाळा व महाविद्यालयाच्या ठिकाणी मंजूर झालेल्या दाखल्यांचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वाटप करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...