आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रात्यक्षिक:आंतरशालेय योगासन स्पर्धेत आसनाचे लक्षवेधी प्रात्यक्षिके

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निरोगी आरोग्य, सदृढ शरीर व प्रसन्न मनासाठी विद्यार्थ्यांमध्ये योगाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशन शह रात जिल्हास्तरीय आंतरशालेय योगासन स्पर्धेचे नगरमध्ये आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले, योगातील सुर्यनमस्कार, वीरभद्रासन, उत्कटासन, उत्तरासन, सेतुबंधासन, नटराजासन, त्रिकोनासन आदी विविध आसनाचे प्रात्यक्षिक लक्षवेधी ठरले.

क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्र्ट राज्य व अहमदनगर जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने जिल्हास्तरीय आंतरशालेय योगासन स्पर्धेचे आयोजन केले होते.

गांधी मैदान येथे झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. अध्यक्षस्थानी बाळकृष्ण सिद्दम होते.जिल्हास्तरीय आंतरशालेय योगासन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी योगासनाची लक्षवेधी प्रात्यक्षीके सादर केली.

बातम्या आणखी आहेत...