आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:पुनतगावासह परिसराच्या विकासाला गती, पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांचे प्रतिपादन

नेवासे/सोनई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या कामांचे भूमिपूजन झाले आहे, ती कामे तर होणारच आहेत. परंतु पाचेगाव-पुनतगाव-चिंचबन रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, पुनतगाव येथील सभामंडप, अशा प्रकारचे जवळपास एक कोटी रुपयांचे इतर विकास कामे प्रस्तावित आहेत. ते देखील मार्गी लावणार आहोत, अशी ग्वाही पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांनी दिली.

मंत्री शंकरराव गडाख यांच्या विकास निधीतून नवे पुनतगाव ते जुने पुनतगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या साडेआठ लाखांच्या निधीतून अंगणवाडी इमारत बांधकाम व विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी अॅड. सोमनाथ वाकचौरे, रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, जि. प. सदस्य तुकाराम शेंडे, सदस्य विक्रम चौधरी, साहेबराव पवार, शिवाजीराव पवार, नामदेव पवार, सुदर्शन वाकचौरे, गुलाब चौधरी, सुधाकर पवार आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...