आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक:अध्यात्म माणसाला जगायचे कसे हे शिकवते; आमदार बबनराव पाचपुते यांचे प्रतिपादन, देवगावात मळगंगा देवी मंदिराचा कलशारोहण सोहळा

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देवगाव या गावाने मला नेहमीच भरभरुन प्रेम दिले आहे. त्यामुळे येथील विकासकामांना नेहमीच सहकार्य राहील, अध्यात्म हे माणसाला कसे जगायचे शिकवते. त्यामुळेच देवगावसारख्या गावात मंदिराच्या कार्यानिमित्त सर्वजण एकत्र आले आहेत, असे प्रतिपादन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले.

नगर तालुक्यातील देवगाव येथे मळगंगा देवी मंदिराचा कलशारोहण सोहळा भाविकांच्या उपस्थितीत झाला. गावातून कलश मिरवणूक काढण्यात आली. कलश पूजेनंतर स्वामी हंसानंदपुरीजी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमास आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी सभापती विलास शिंदे, सरपंच संभाजीराजे वामन, उपसरपंच हरिदास खळे, चेअरमन मच्छिंद्र शिंदे आदी उपस्थित होते. सरपंच संभाजीराजे वामन व कविता वामन यांच्या हस्ते कलशपूजन करून मिरवणूक काढण्यात आली. आमदार पाचपुते यांनी स्थानिक विकास निधीतून देवगावमध्ये पेव्हिंग ब्लॉकच्या कामासाठी ७ लाख रुपये मंजूर केले आहेत. या कामाचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

कर्डिले म्हणाले, ९ वर्षांपूर्वी मळगंगा देवी मंदिराच्या कामाचे भूमीपूजन माझ्याच उपस्थितीत झाले होते. आज कलशारोहण कार्यक्रमालाही उपस्थित राहता आले याचा आनंद आहे. नगर तालुका हा दुष्काळी, जिरायती तालुका आहे. दोन वर्षापासून करोनाचे संकट सर्वांनी सहन केले. अशा परिस्थितीतही मंदिराच्या कामासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आले हे कौतुकास्पद आहे. मळगंगा देवीच्या कृपाशिर्वादाने येथे चांगला उत्कर्ष होईल असा विश्वास आहे. या गावाच्या विकासासाठी जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा नक्कीच मदत करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमास पंढरीनाथ वामन, कुंडलिक वामन, विजय वामन, दिलीप ताकटे, अंकुश वामन, अशोक देसर्डा आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार सोमनाथ वामन यांनी मानले.