आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर गुरुकुल मंडळाचे नेते संजय कळमकर यांनी राजकीय सन्यासाची घोषणा केली होती. या घोषणनेंतर गुरुकुल मंडळ व शिक्षक समितीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढत गेली. त्यामुळे गुरुकुल मंडळाचे नेते संजय कळमकर यांनी शिक्षक समितीशी फार्कत घेऊन शिक्षक संघाच्या थोरात गटाशी घरोबा करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीत उभी फूट पडत असताना, समितीचे राज्य नेते रा. या. औटी व जिल्हाध्यक्ष संजय धामणे यांनी, समिती अभेद्य असल्याचा दावा केला आहे.
शिक्षक बँक निवडणुकीपासूनच गुरुकुलमधील अंतर्गत धुसफूस वाढत गेली, वादाची पहिली ठिणगी निकालानंतर पडली. एकमेकांच्या पश्चात आरोप प्रत्यारोपही झाले. परंतु, निवडणुकीत समितीने उतरवलेल्या गुरुकुल मंडळाला विरोधी बाकावर बसावे लागले. आता गुरुकुल मंडळाचे नेते समितीमधील काही पदाधिकाऱ्यांना घेऊन संभाजी थोरात गटात जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे निवडणूक कालावधीत गुरुकुलने केलेल्या खर्चाच्या हिशेबाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. समितीचे धामणे व औटी यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात, जिल्ह्यातील शिक्षक समितीचे सर्व पदाधिकारी व समितीप्रेमी शिक्षकांना सबुरीचे आवाहन केले आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात, समितीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे समितीत अनेकांनी प्रवेश केला.
तथापि, निवडणुकीत जिल्ह्याने नेतृत्व नाकारल्याने राजकारणातून संन्यास घेण्याच्या बातम्या पेरून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काही कार्यकर्त्यांचा गट बाजूला करून दुसऱ्या संघटनेची वाट धरली, असा टोला धामणे यांनी लगावला. तसेच समितीप्रेमींनी काही दिवस संयम बाळगावा, लवकरच समितीचा जिल्हा मेळावा आयोजित केला जाईल, असे स्पष्ट केले. या निवेदनात उच्चाधिकार समितीचे नितीन काकडे, अनिल आंधळे, राज्य प्रतिनिधी सिताराम सावंत, बापू लहामटे, मिलिंद पोटे,प्रताप पवार, रघुनाथ लबडे, ईश्वर माने, संभाजी औटी, दत्ता गरुड, प्रल्हाद साळुंके, विजय महामुनी, दत्ता जाधव आदींची नावे आहेत.
कळमकर पुन्हा शिक्षक राजकारणात कळमकरांच्या रुपाने नोंदणीकृत गुरुकुल मंडळच समितीत प्रवेश करणार असल्याचे मानले जाते. त्यामुळे संन्यासाची घोषणा करणारे, कळमकर पुन्हा शिक्षक राजकारणात सक्रीय झाले, तर दुसरीकडे धामणे व औटींनी समिती बळकट करताना तरुणांना संधी देण्याची भूमिका घेतली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.