आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Spontaneous Response From The Audience To The District Level Dance Competition At Rahuri Factory, An Initiative On Behalf Of Vaishnavi Chowk Youth Foundation | Marathi News

सांस्कृतिक:राहुरी फॅक्टरी येथील जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद, वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने उपक्रम

देवळाली प्रवरा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 50 जणांनी घेतला सहभाग

राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने गुढीपाडवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा शनिवारी उत्साहात पार पडल्या. जिल्ह्यातील अनेक स्पर्धकानी सहभाग नोंदवून रसिकांचे मनोरंजन केले.

स्पर्धेचे उदघाट्न माजी आमदार तथा शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, आझादचे संदीप कदम, डीएमसीचे चेअरमन तथा भाजपचे शहराध्यक्ष अजित चव्हाण, सचिन जाधव, माजी चेअरमन शहाजी कदम, मोहसीन शेख, भारत शेटे, सुरेश दोंड, अरुण पटारे, दत्तात्रय गागरे, योगेश मोरे, वसंत सिनारे आदी उपस्थित होते.

‌जिल्ह्यातील ५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. माजी आमदार म्हणाले चंद्रशेखर कदम म्हणाले, नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कलावंताना प्रोत्साहन मिळावे, यासाठी वैष्णवी चौक नेहमी झगडत असते. या सर्व तरुणांचे संघटन आदर्शदायी आहे. अशा उपक्रमांतून तरुणांत नवचैतन्य निर्माण होते. माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. प्रास्तविक संस्थापक वसंत कदम यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षण मुंबई येथील कोरिओग्राफर अश्विनी इरोळे, नाशिक येथील प्रशांत दामरे व शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी केले. यावेळी राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक नीरजकुमार बोकील, सहायक पोलिस उपनिरीक्षक बोरसे, माजी नगरसेवक सचिन धस, काँग्रेसचे जिल्हा सचिव अजय खिलारी, बाळासाहेब आढाव, सचिन सरोदे, संतोष झावरे, बाबासाहेब देठे, अजित येवले, प्रशांत काळे, बाळासाहेब लोखंडे, अनिल येवले, विष्णुपंत गिते आदी उपस्थित होते. यावेळी कानडगावच्या पूजा गागरे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले.

लावणी, फ्युजन, देशभक्तीपर नृत्याचे स्पर्धकांकडून सादरीकरण
विजेते संघ व स्पर्धक

सामूहिक नृत्य : मोठा गट प्रथम स्नेहमाला आकादमी श्रीरामपूर, द्वितीय शाहरूख डान्स ग्रूप शिर्डी, लहान गट : प्रथम भाग्यश्री डान्स अकादमी राहुरी, द्वितीय ऍश ग्रूप, नगर, तर उत्तेजनार्थ लिटिल मोरया ग्रूप, श्रीरामपूर ठरले. सोलो नृत्य : मोठा गटात प्रथम राजेश व्यवहारे, द्वितीय प्रकाश साळुंके व तृतीय शुभम गायकवाड, लहान गट : प्रथम तेजस्विनी शेळके, द्वितीय भक्ती चुत्तर, तर तृतीय माही चौदंते ठरली.

बातम्या आणखी आहेत...