आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओंकार आदिनाद कला प्रतिष्ठान आयोजित व ओंकार भजनी मंडळ प्रस्तुत महिला ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ या कार्यक्रमास रसिकांचा प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात लोककला, भारुड, नाट्य, संगीत, मंगळागौरीचे पारंपारिक खेळ, उखाणे, व्यसनमुक्ती पोवाडा, भरतनाट्यम इत्यादी विविध कलांचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमात वनिता दहीवाले, सुलोचना दळवी, नीला बोरकर, अनिता खजिनदार, सुनिता असलकर, वनिता दळे, मीनाक्षी सरोदे, अंजना भुजबळ, मेघा बकरे, लक्ष्मी गायकवाड, शोभा भुतकर आश्लेषा पोतदार या सहभागी कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांची मने जिंकून घेतली.
‘वऱ्हाड निघालयं लंडनला’ या एकपात्री नाटकातील काही प्रवेश अनिकेत देऊळगावकर यांनी करून रसिकांना हसवले. नेहा दरवडे, गीतांजली सगम, पायल वाळके यांनी मराठी मालिकांचे शीर्षक गीते गात रसिकांची दाद मिळवली. या कार्यक्रमाची संकल्पना व मार्गदर्शन संगीता देऊळगांवकर यांचे होते. त्यांनी कार्यक्रमाला संवादिनी साथ तर शेखर दरवडे, धनंजय गोहेर यांनी तबला साथ केली. सूत्रसंचालन श्रद्धा देऊळगावकर यांनी केले.
पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलिस उपनिरीक्षक अल्ताफ शेख यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देऊळगांवकर यांनी केला. या कार्यक्रमास संस्कार भारतीचे अध्यक्ष आणि नाट्यरंगकर्मी दीपक शर्मा, सचिव विलास बडवे, ‘तुला पाहते रे’ फेम अभिनेते मोहिनीराज गटणे, देवीप्रसाद सोहनी, श्रीराम तांबोळी, आनंद कुलकर्णी, प्रसाद सुवर्णपाठकी, साहित्यिक सदानंद भणगे, अभियंता अविनाश कुलकर्णी, रघुनाथ सातपुते, सुनील लांडगे, प्रमोद मुळे, सुनील राऊत, शरद बरबरे, डॉ. भावना शेळके, सुजाता झांबरे, नागरदेवळे सरपंच सविता पानमाळकर, उपसरपंच सोनाली भंडारे, ग्रामपंचायत सदस्य रोहिणी जगताप, रमेश बिडवे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.