आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी जल्लोष -2022:क्रीडा स्पर्धांमुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढीस मदत ; जनरल चॅम्पियनशीप नगर उपविभागाकडे

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपण शासकीय सेवा करतो. परंतु आपल्यातील कलागुणांना वाव मिळत नाही. खिलाडूवृत्ती व सुप्त गुण प्रत्याख्यान अंगी असतात. परंतु श्रीकरणी संधी मिळत नाही. कृषी विभागाने कृषी जल्लोषच्या माध्यमातून ही उपलब्ध करून दिली. अशा स्पर्धांमुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढीस लागण्यास मदत होते. सर्वांना यात सामावून घेतल्याने सांघिक भावना निर्माण होते. महिलांमधील सुप्त गुणांना विशेष वाव मिळतो. सर्वांसाठी ही सुवर्णसंधीच आहे, असे प्रतिपादन नगरच्या उपवन संरक्षक सुवर्णा माने यांनी केले.कृषी विभागाच्या वतीने कृषी जल्लोष २०२२ अंतर्गत आयोजित दोन दिवसीय जिलास्तरीय कला व क्रीडा स्पर्धा समारोप नगरच्या उपवन संरक्षक माने यांच्या हस्ते पारितोषिक वितरणाने झाला. त्यावेळी त्या बोलत होते. जनरल चॅम्पियनशीप नगर उपविभागाला मिळाली. माने यांच्या हस्ते ट्रॉफी नगर उपविभागाला देण्यात आली.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, कृषी उपसंचालक रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे (संगमनेर), प्रकल्प उपसंचालक राजाराम गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, विलास नलगे, अनिल गवळी, जि. प. कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, पोपटराव नवले, कृषी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष गिरीश बिबवे, राज्य अध्यक्ष सोमनाथ बाचकर, राजेंद्र सुपेकर, राजकुमार वाणी, शंकर खाडे, दत्तात्रेय रोहकले, अशोक बोरा, सुशीलकुमार पैठणकर, तालुका कृषी अधिकारी , तंत्र अधिकारी किरण मोरे, शंकर खाडे, जालिंदर गांगर्डे, जयवंत गदादे, चंद्रकांत तांदळे, जयंत जाधव उपस्थित होते.

प्रास्ताविक सोमनाथ बाचकर म्हणाले की, खेळीमेळीच्या वातावरण दोन दिवस कृषी जल्लोष २०२२ अंतर्गत कला व क्रीडा स्पर्धा पार पडल्या. भेदभाव न करता प्रत्येकाने स्पर्धेत सहभागी होऊन आनंद साजरा केला. गोळा फेक, लांब उडी, दोरी उडी, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस अशा विविध स्पर्धा घेण्यात येऊन त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आलेे, असे त्यांनी सांगितले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सोमनाथ बाचकर, दत्तात्रेय रोखले, शंकर खाडे, किरण मोरे, जालिंदर गांगर्डे, जयवंत गदादे, चंद्रकांत तांदळे, जयंत जाधव, राजेंद्र सुपेकर यांनी विशेष प्रयत्न केले. सर्व सहभागींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन संजय मेहेत्रे यांनी केले, तर आभार दत्तात्रेय रोखले यांनी मानले.

सांघिक भावना वाढीस लागावी, हा स्पर्धा उद्देश कार्यरत असताना अधिकारी व कर्मचारी नाते असते. परंतु खेळात हे नातं संपुष्टात येऊन तो फक्त खेळाडू असतो. खेळात मोठी ताकद आहे. तुमच्यातील कौशल्य व कलागुणांना सादर करण्याची संधी आपणास मिळाली. मनुष्य सामाजिक भावनेने पुढे आल्याने सांघिक ताकद घेऊन पुढे जात आहोत. सांघिक भावना टिकून राहून वाढीस लागावी, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे, असे शिवाजीराव जगताप म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...