आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:खेळामुळे संघभावनेसह नेतृत्त्वगुण विकसित होण्यास मदत, जैन ओसवाल पंचायत सभेचे नरेंद्र फिरोदिया यांचे प्रतिपादन

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जैन ओसवाल युवक संघाच्या वतीने सोहम कप क्रेझी क्रिकेट स्पर्धा

खेळामुळे संघभावना, नेतृत्त्वगुण विकसित होण्यास मदत होते. जैन ओसवाल युवक संघाने राहुल पितळे यांच्या स्मरणार्थ क्रेझी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला आहे. पितळे हे जॉईजच्या स्थापनेपासूनचे सक्रीय सभासद होते. दोन वर्षानंतर ही स्पर्धा होत असल्याने सर्वांनी खेळाचा निखळ आनंद घ्यावा. यातून एकत्र येत, आपुलकीचा संवाद घडण्यास मदत होईल, असा विश्वास जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला.

अहमदनगर जैन ओसवाल पंचायत सभेच्या जैन ओसवाल युवक संघ (जॉइज) च्यावतीने नगरमध्ये सोहम कप क्रेझी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अहमदनगर क्लब मैदानावर शानदार समारंभात स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी नरेंद्र फिरोदिया बोलत होते. कार्यक्रमास मनपा महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती मीनाताई चोपडा, सी. ए. अशोक पितळे, राखी राहुल पितळे, जैन ओसवाल पंचायत सभेचे प्रधान मंत्री शैलेश मुनोत, मानद मंत्री संतोष गांधी, उद्योजक राजेश भंडारी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, मर्चंटस बँकेचे संचालक आदेश चंगेडिया, कमलेश भंडारी, अमित मुथा, मीनाताई मुनोत, किशोर मुनोत, सागर गांधी, संपतलाल मुथियान, अॅड. विजय मुथा, दीपक गांधी, बाळासाहेब भंडारी, मेहूल भंडारी, राजेंद्र गांधी, अजित बोरा, मनिष चोपडा आदी उपस्थित होते.

सी. ए. अशोक पितळे यांनी मनोगत व्यक्त केले. १० एप्रिलपर्यंत ही स्पर्धा होणार असून यात १२ मुख्य संघांसह ४ महिलांचे व ४ मुलांचे संघ सहभागी झाले आहेत. मुख्य बारा संघांमध्ये महावीर सुपर किंग्ज, साईदीप हिरोज, न्यू एज फायटर्स, टिम सुरभि, लक्षदीप वारियर्स, रेड रायडर्स, आयकॉन रायझर्स, वर्धमान प्लाय वारियर्स, शिवाज्‌ वारियर्स, राज रॉयल्स, एससी स्ट्राईकर्स, एमबी स्ट्राईकर्स, महिलांचे माइंड चॅम्प, एसके न्यू संकल्प, नमोह ९९, सोल स्पार्टन्स, मुलांचे सोहम सुपरकिंग्ज, चंगेडिया रॉयल्स, प्रीत वारियर्स या संघांचा सहभाग आहे. दररोज सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ११ या वेळेत सामने होत आहेत. तीनही गटात प्रथम तीन विजेत्यांना रोख पारितोषिकासह ट्रॉफी तसेच सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय मॅन ऑफ दि मॅच, मॅन ऑफ दि सिरीज, बेस्ट फलंदाज, बेस्ट गोलंदाज, बेस्ट क्षेत्ररक्षक अशी पारितोषिकेही असणार आहेत. सूत्रसंचालन करून आभार भावना बोरा (कासवा)यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन ओसवाल युवक संघ व जैन ओसवाल पंचायत सभेचे पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...